Latest Motivational Quotes in Marathi 2023 | मराठीतील प्रेरक कोट्स

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खास तुमच्यासाठी काही खास “Motivational Quotes in Marathi” तयार केले आहेत, जे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देतील आणि तुम्ही अधिक उत्साहाने आणि उत्कटतेने तुमच्या ध्येयासाठी कठोर परिश्रम करण्यास स्वतःला प्रवृत्त कराल. तयारी करण्यास सक्षम व्हाल.

प्रत्येक वेळी प्रमाणेच आमची विनंती आहे की तुम्ही खाली लिहिलेले सर्व “Motivational Quotes in Marathi” काळजीपूर्वक वाचा कारण कोणते कोट्स तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देतील हे कोणास ठाऊक आहे.

Motivational Quotes in Marathi

सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.

समर्थक कमी झाले तरी चालतील,
पण विरोधकांची गर्दी
कमी होता कामा नये,
कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

Advertisements

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे,
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

Self Motivation Positive Motivational Quotes in Marathi

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

Advertisements

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

Positive Motivational Quotes in Marathi

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

Advertisements

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

Positive Thinking Motivational Quotes in Marathi

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.

Advertisements

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

Read this also:

Best 85+ Motivational Quotes in Tamil | தமிழில் ஊக்கமளிக்கும் மேற்கோள்கள்

Struggle Motivational Quotes in Hindi 2023

200+ Best Motivational Quotes in Hindi, Lines & Images

Share this post:
Advertisements

Leave a Comment